1) What is CineGappa?
Originally published in Oct 2017
नमस्कार, माझं नाव आशय जावडेकर. मी एक फिल्ममेकर आणि इंजिनीयर आहे. मला सिनेमे बघायला प्रचंड आवडतं आणि त्याविषयी बोलायला त्याहून जास्त. मी अमेरिकेत इंजिनीरिंग मध्ये PhD करत असताना मला सिनेमाचं वेड लागलं आणि मी सिनेमे बनवायला पण लागलो. हे सिनेमे बघताना, बनवताना मला जे काही शिकायला मिळतं, अनुभवायला मिळतं, त्याविषयी मी गप्पा मारणार आहे. That’s Cinegappa!
मी माझी थोडक्यात ओळख करून देतो. मी सध्या अमेरिकेमध्ये राहतो आणि गेली ९-१० वर्षे मी इथे फिल्म्स करतो आहे. मी नुकतीच एक Shanks नावाची एक feature film केली. ही फिल्म Amazon Instant Video वरती US, UK, Germany आणि Japan मध्ये बघायला उपलब्ध आहे (click here), आणि बाकीच्या देशांमध्ये (including India) आमचे प्रयत्न चालू आहेत ती फिल्म कुठल्या ना कुठल्या माध्यमातून प्रदर्शित करायचे. माझ्या आधीच्या फिल्म्स तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या http://www.ashayjavadekar.com या website वरती त्या उपलब्ध आहेत.
मी जरी गेली ९-१० वर्षे फिल्म्स करत असलो तरी माझं शिक्षण filmmaking मधलं नाही. मी UDCT मुंबई इथून Chemical Engineering मध्ये शिक्षण घेतलं, आणि मग अमेरिकेमध्ये त्याच विषयात PhD करायला आलो. मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला असं जाणवलं की जर तुम्हाला तुमचा मुख्य विषय सोडून बाकीच्या कुठल्या विषयामध्ये रस असेल तर शिक्षण घ्यायची इच्छा असेल, तर त्या शिक्षणाचा access तुम्हाला त्याच युनिव्हर्सिटीच्या परिसरात (campus) मध्ये असू शकतो. माझं तसंच झालं. मला आधीपासूनच movies आणि theater मध्ये आवड होती आणि आमच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररी मध्ये एक movie department होतं. तिथे जगभरातले सिनेमे, वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे DVDs, Blurays, १६ mm फिल्म, असे उपलब्ध होते. ही लायब्ररी युनिव्हर्सिटी ची असल्याने आणि मी त्याच युनिव्हर्सिटी चा विद्यार्थी असल्याने मी अर्थातच हे सिनेमे free of cost उपलब्ध होते. तिथे मग मला सिनेमे बघायचं वेड लागलं आणि मी ३ वर्षे, दररोज एक, असे तिथे सिनेमे बघितले. हे सिनेमे बघत असताना, त्याच्या DVDs चा special features मध्ये काही ते सिनेमे कसे बनवले गेले याचे माहितीपट होते, ते मी पाहिले आणि तेव्हा मला सिनेमे कसे बनवतात याची थोडीफार ओळख झाली.
Turning Point तेव्हा आला जेव्हा याच लायब्ररी मध्ये त्याच movie department च्या शेजारी एक multimedia design center उघडलं, जिथे industry standard filmmaking equipment, editing softwares सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली गेली. तेव्हा मग माझ्यासमोर एक मोठं ज्ञानाचं दालन उघडलं. मी तिथे editing शिकलो, filmmaking शिकलो आणि मग मी फिल्म्स बनवायला लागलो.
या फिल्म्स बनवताना मी नेहमी एक विचार डोक्यात ठेवतो की मला प्रत्येक फिल्म मधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं पाहिजे. तशी शिकायची गरज मी निर्माण करतो आणि मग तसे प्रोजेक्ट्स निवडतो. तुम्ही माझ्या website वरती माझी पहिली फिल्म बघितलीत तर ती फक्त एका शॉट ची आहे (no editing), कारण मला एडिटिंग च्या आधीचं सगळं तेव्हा शिकायचं होतं. नंतर मी एक १६ mm फिल्म वापरून फिल्म केली, एक ऍनिमेशन फिल्म केली, एक english फिल्म केली, एक horror केली, असे बरेच प्रयोग मी केले आणि अजूनही करतो आहे.
हे सगळं करताना माझी इंजिनीरिंग ची एक stream समांतर चालूच आहे, आणि मला नेहमी engineering मधली principles आणि filmmaking मधली principles यामध्ये साम्य दिसत आलेलं आहे. म्हणजे मी जेव्हा PhD करत असताना technical articles लिहायचो ते, आणि त्याच वेळेला फिल्म्सच्या scripts लिहायचो ते, हे दोन्हीमध्ये खूप साधर्म्य होतं. आत्तासुद्धा मी एका manufacturing company मध्ये काम करतो तिथे सुद्धा मला तिथली manufacturing ची principles आणि फिल्ममेकिंग मध्ये साम्य जाणवत आलेलं आहे. या सगळ्यावरती एक काहीतरी विचारमंथन करावं असं मला खूप वर्षांपासून वाटत होत, त्यासाठी ही “सिनेगप्पा” नावाची series मी चालू करतो आहे. “
सिनेगप्पा म्हणजे काय याची थोडक्यात कल्पना तुम्हाला आता आली असेल. तर मी हा लेख आता इथेच थांबवतो. पुढच्या लेखात / एपिसोड मध्ये आपण in general, एक big picture point of view ने इंजिनीरिंग आणि फिल्ममेकिंग याविषयी बोलू आणि या दोन्ही गोष्टी मला सारख्या का वाटतात याविषयी थोडंसं चर्विचर्वण करू. मग अजून खोलात त्याच्यापुढच्या लेखांमध्ये जाऊ.