
CineGappa is my Marathi podcast and article series about analogies between films and engineering.
The podcast is available on all major podcast platforms.
If you would like to read instead, the links to the articles are below.
मागच्या लेखामध्ये मी असं म्हणालो की इंजिनीरिंग आणि फिल्म्स या एकमेकांना पूरक अशा “कला” आहेत (complementary arts). पण खरंच या दोन्ही कला आहेत का? का एक विज्ञान आहे आणि एक कला? कला आणि विज्ञान यातला फरक समजण्यासाठी आधी “आत्मनिष्ठ (subjective)” आणि “वस्तुनिष्ठ (objective)” या विशेषणांचे अर्थ समजून घेऊ. ज्याचा आपल्याला इंजिनीरिंग आणि फिल्म्स मधलं साधर्म्य दाखवायला उपयोग होईल. Breaking Bad, Ozark, The Godfather, King’s speech अशा या लेखातील उदाहरणांमध्ये सुद्धा या साधर्म्याची प्रचिती येईल.
मागच्या लेखामध्ये आपण असा विचार मांडला की इंजिनीरिंग आणि फिल्म्स या दोन्ही कला आहेत आणि विज्ञानाचं उपयोजन (Application) म्हणजे इंजिनीरिंग हे आत्मनिष्ठ (subjective) आहे. आता याचा अजून सखोल विचार या लेखात करू. इंजिनीरिंग मधल्या transport phenomena या application विषयी थोडक्यात चर्चा आणि त्याचा वापर जो जीता वोही सिकंदर, झेंडा, मोहब्बते, टायटॅनिक आणि माझी फिल्म “The Script” या फिल्म्स समजायला कसा उपयोगी ठरू शकतो याचा विचार करू.
मागच्या लेखामध्ये आपण असा विचार मांडला की फिल्म्स मधली पात्रं emotional gradient (भावनिक पातळीतला फरक) मधून जातात. परंतु ही पातळी मोजायचं काही परिमाण आहे का? उपनिषदांमध्ये सांगितलेल्या कुंडलिनी शक्ती या संकल्पनेचा वापर करून याचं परिमाण शोधता येतं. या कल्पनेचा वापर करून, हॅरी पॉटर, अक्षय कुमार (अजनबी), अतुल कुलकर्णी (दहावी फ), गॅंडॉल्फ (Lord of the Rings) इत्यादी फिल्म्स मधील पात्रांची भावनिक पातळी मोजायचा प्रयत्न या लेखात केला आहे.
मागच्या लेखामध्ये मी फिल्म्स मधल्या पात्रांची भावनिक पातळी (emotional level) ही कुंडलिनी ऊर्जा या उपनिषदातल्या संकल्पनेचा वापर करून मोजायचा प्रयत्न केला. त्याच्या मागच्या लेखामध्ये मी “emotional gradient” यांच्याविषयी बोललो. या लेखामध्ये या दोन्ही कल्पना एकत्र करून, “कुंडलिनी gradient” अशा एका नवीन कल्पनेला जन्म घातलेला आहे. ही कल्पना पाठीशी घेऊन, अनेक फिल्म्सच्या उदाहरणांसहित inspiring आणि tragic characters कशी बनतात याचा विचार या लेखामध्ये करू.
मागच्या लेखामध्ये आपण “कुंडलिनी ग्रेडियंट” विषयी बोललो, जो फिल्म्स मधल्या पात्रांच्या भावनिक प्रवासासाठी आवश्यक आहे. परंतु पात्रांना हा प्रवास करण्यासाठी कोण भाग पाडतं? यासाठी जे तीन महत्वाचे घटक लागतात, म्हणजे नायक, जिज्ञासा आणि संघर्ष यांच्याविषयी या लेखामध्ये माहिती आहे. Inception, Matrix, Forrest Gump, Gladiator, Toy Story, Finding Nemo, मराठा तितुका मेळवावा अशा चित्रपटांचे नायक आणि त्यांना असलेली जिज्ञासा ओळखायचा प्रयत्नही या लेखातून केला आहे.
मागच्या लेखामध्ये आपण नायक आणि जिज्ञासा (Hero and Desire) यांच्याविषयी बोललो. तिसरी महत्वाची गोष्ट ज्याच्यामुळे फिल्ममधली पात्र कुंडलिनी ग्रेडियंट मधून जातात ते म्हणजे संघर्ष. संघर्ष म्हणजे नेमकं काय, तो कशा स्वरूपात येतो याचा विचार या लेखामध्ये केला आहे. माझ्या काही फिल्म्स, आणि काही हॉलिवूड मधल्या फिल्म्स, आणि नेटफ्लिक्स वरच्या काही सिरिअल्स या उदाहरणांमधून ही कल्पना अधिक विस्ताराने मांडली आहे.
आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये कथेमध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा जो आपण विचार केला, त्या सर्व गोष्टी संक्षिप्तरित्या एकत्रितपणे अनेक सिनेमांच्या ट्रेलर मध्ये बघायला मिळतात. अशा अनेक वेगवेगळ्या सिनेमांच्या ट्रेलर चा यामध्ये आढावा घेतला आहे. त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्लिश आणि काही माझे चित्रपट यांचा समावेश आहे.
कथा आणि कथेची रचना याविषयी आपण मागच्या लेखांमध्ये बोललो. पटकथा आणि कथा यातला फरक काय, पटकथा म्हणजे काय, स्टोरीबोर्ड म्हणजे काय याविषयी या लेखात जाणून घेऊ.
या लेखापासून थोडी तांत्रिक चर्चा चालू होणार आहे. चित्रपट हे दृकश्राव्य माध्यम असल्याने, छायाचित्रण हा चित्रपटांचा गाभा आहे. या लेखामध्ये छायाचित्रणाविषयी म्हणजेच Cinematography विषयी बोलूया.
सिनेमा हे दृक्श्राव्य माध्यम आहे, आणि त्यातल्या दृक, म्हणजे video aspect मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॅमेरा. वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमधला फरक, analog आणि digital मधला फरक, digital video मुळे झालेला तंत्रज्ञानातला आमूलाग्र बदल त्याच्याविषयी आपण या भागात बोलू.
मागच्या लेखामध्ये कॅमेऱ्याच्या तंत्रज्ञानाविषयी बोललो, आणि डिजिटल आणि ऍनालॉग यांच्यात काय फरक आहे याची पण थोड्याफार प्रमाणात चर्चा केली. आता यापुढे आपण डिजिटल तंत्रज्ञानावरती लक्ष केंद्रित करू, कारण डिजिटल विडिओ च्या aspect ratio विषयी बोलू.
या माझ्या पहिल्या लेखामध्ये सिनेगप्पा म्हणजे काय आहे याच्याविषयी लिहिलं आहे, तसंच माझ्याविषयी आणि माझ्या फिल्म्सविषयी थोडक्यात माहिती दिली आहे. मी फिल्ममेकिंग करत असताना माझी जी समांतर engineering ची stream चालू आहे, त्या दोन्ही क्षेत्रांमध्ये मला पदोपदी साधर्म्य जाणवत आलेलं आहे, आणि या सदृशतेवरती या सदरातले लेख असतील असा माझा विचार आहे.