
21) विक्रीची ऑर्डर कशी द्यावी?
एखादा शेअर खरेदी करण्यासाठी ब्रोकरकडे ऑर्डर कशी द्यावी आणि त्यानंतर काय करावे याची माहिती आपण घेतली. त्यानुसार आपल्या फाईलमध्ये ब्रोकरची कॉन्ट्रॅक्ट नोट आपण लावूनही ठेवली. विक्रीची ऑर्डर देतानाही अशीच क्रिया करावी लागेल.

22) ट्रान्स्फर अर्ज भरण्याची पद्धती
आपल्याकडील ‘बेअरर डिलिव्हरी’ (म्हणजे शेअर सर्टिफिकेट आणि आधीच्या मालकाने सही केलेला ट्रान्स्फर अर्ज) एकदा नावावर चढवून घेण्यासाठी पाठवायची असे ठरविल्यावर आपल्याला काय काय करावे लागेल?

23) व्यवहारपूर्तीच्या खाचाखोचा समजणे महत्त्वाचे
आतापर्यंत आपण ब्रोकरकडे ऑर्डर नोंदवून शेअर खरेदी केले. काही दिवसांनी त्यांची डिलिव्हरी घेतली, पैसे देऊन ब्रोकरशी व्यवहार पुरा केला. नंतर योग्य स्टॅम्प लावून आणि ट्रान्स्फर फॉर्म भरून हा शेअर नावावर चढविण्यासाठीही पाठवले. सगळ्या गोष्टी सुरळीतपणे पार पडल्या तर काय काय करायचे हे आपण पाहिले.

24) लाभांशाचा धनादेश कसा मिळतो?
आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतल्यानंतर प्रत्यक्ष ती डिलिव्हरी हातात येईपर्यंत मध्यंतरीच्या काळात कंपनीचे काही लाभांश, बोनस अथवा राईट दिला नाही ना याकडे लक्ष ठेवावे.

25) बोनस शेअर्स
बोनस शेअर आणि राईट इश्यू हे शेअर बाजारातले परवलीचे शब्द आहेत. अगदी स्वत:जवळ एकही कंपनीचे शेअर न बाळगणारा, परंतु वर्तमानपत्र वाचणारा माणूसदेखील ‘कोलगेटनं दर तीन वर्षाला बोनस दिला आहे’ किंवा ‘बजाज ऑटोचा बोनस येणार आहे’ वगैरे माहिती सांगायला सरसावून तयार असतो.

26) बोनसची किमया
शेअरबाजारातील पहिला परवलीचा शब्द म्हणजे बोनस, तर दूसरा शब्द म्हणजे राईटस् इश्यू!

27) राईट इश्यू
कंपन्या जेव्हा इश्यू काढतात तेव्हा त्या आधीच्या शेअर-होल्डरपुढे वाढीचा काही प्रस्ताव घेऊन येतात. त्यासाठी जी पैशाची गरज असते ती भागविण्यासाठी शेअर होल्डर्सकडे पुन्हा काही नवीन शेअरच्या विक्रीचा प्रस्ताव मांडतात. आता असा हा प्रस्ताव आधीच्या शेअरहोल्डर्सपुढेच का मांडावा?

28) ‘ऑड लॉट’चा गुंता
बोनस आणि राईट इश्यू यामुळे, आपल्याकडचे शेअर्स कसे वाढतात हे आपण पाहिले. नवे बोनस अगर राईट शेअर्स आले की पहिले आपल्याकडे असलेले त्याच कंपनीचे शेअर्स विकून फायदा मिळवणे हा शेअर बाजारातील फायदा मिळवण्याचा सोपा व्यवहार आहे. हा कुणालाही जमतो.

29) ऑडलॉट शेअरसाठीचा सल्ला
ऑडलॉट शेअरसाठी काय काय करता येईल याचा मागोवा आपण थोडक्यात घ्यायचा प्रयत्न केला. परंतु शेअर बाजार किंवा सरकारने यासंबंधी काही नियम किंवा मार्गदर्शक तत्वे मांडली आहेत की नाहीत?

30) वायदेबाजार म्हणजे काय?
शेअरबाजारातील गुंतवणुकीबद्दल एवढी माहिती घेतल्यावर आणि त्यातले फायदे उदाहरणासह पाहिल्यावर या बाजारात एवढी भीती कशाची असते, हा प्रश्न उरतो.

31) शेतात हळद आणि सांगलीत गोंधळ
प्रत्यक्ष माल न देता-घेता फक्त पुढे कधीतरी आपण तो देऊ किंवा घेऊ असे वायद्याचे व्यवहार कसे होऊ शकतात हे आपण मागील लेखात पाहिले. आता असे व्यवहार करण्यासाठी उदाहरणादाखल आपला व्यापारी क्रमांक एक शेतकऱ्याकडे गेला, तर व्यापारी क्रमांक दोन शेतकऱ्याकडून चौकशी करत करत पहिल्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचला. परंतु अशी धावाधाव न करता या व्यवहारांमध्ये इच्छुक लोकांना एकत्र आणण्याचे काम करण्यासाठी वायदेबाजार भरवीला जातो.

32) नित्य व्यवहारातही अनेक वायदे
वायदे व्यवहारांची माहिती घेतल्यानंतर आपल्या शेअरबाजाराकडे वळण्यापूर्वी वायद्याचाच थोडा विचार करू.

33) सट्ट्याचे व्यवहार कसे चालतात
इतर वायदे बाजारात व्यवहारपूर्तीचे कालखंड बराच मोठा जवळजवळ तीन-चार महिन्यांचा असला तरी शेअरबाजारात मात्र तो त्या मानानं फारच छोटा दोन आठवड्यांचाच असतो. ज्या शेअर्समध्ये वायद्याचे व्यवहार होऊ नयेत असे गृहीत आहे त्या रोखीच्या गटात तर आता हा कालखंड फक्त एक आठवड्याचाच केला आहे.

34) भावांच्या चढउताराचे गणित काय?
प्रत्यक्ष खिशात पैसे नसताना ४,४८,००० रुपयांचे शेअर्स एकाच व्यवहारपूर्ती कालखंडामध्ये घेऊन त्याच कालखंडात फायद्यात विकल्यामुळे मला एक लाखाहून जास्त रुपये कसे मिळाले हे मागील लेखात पाहिले. परंतु प्रत्यक्षात दरवेळी असे करणे जमेलच का?

35) ‘किंमत’ व ‘दर’ यांमध्ये गोंधळ नको
प्रत्यक्ष खिशात पैसे नसूनही लाखो रुपयांची उलाढाल कशी करता येते आणि त्यामधून प्रचंड नफा किंवा तोटा कसा होऊ शकतो हे आपण पाहीले. परंतु ते वर्णन कितीही जरी आकर्षक वाटले, तरी त्यातील धोके ओळखून त्या बाजूला न जाणे चांगले!

36) चांगल्या कंपन्यांतील गुंतवणूक फायद्याची
प्रत्यक्ष खिशात पैसे नसताना लाखो शेअर्सची उलाढाल करणारे सट्टेबाज आपण पाहिले. ठराविक शेअर्सची किंमत मनाशी पक्की करून गर्दीच्या मानसिक अवस्थेत स्वत:ला न अडकू देणारे अभ्यासू गुंतवणूकदारही पाहिले.

37) पोर्टफोलिओ मॅनेजमेंट-धारावाही कार्यक्रम
वेगवेगळ्या प्रकारे शेअरबाजारात सट्टा खेळणारे आणि गुंतवणूक करणारे लोक पाहिल्यावर आता हळूहळू आपण ‘Portfolio Management’ या विषयापर्यंत येऊन पोहोचलो आहोत.

38) निरनिराळे शेअर घेण्यात जोखीम कमी
प्रत्येक शेअर होल्डरकडे शेअरचा एक पोर्टफोलिओ असतो. सुरुवात जरी एका कंपनीच्या शेअर खरेदीपासून झाली, तरी हळूहळू काही वर्षात असा पोर्टफोलिओ उभा केला जातो. या पोर्टफोलिओची मुळात गरजच काय?

39) शेअर निवडीला अनेक निकष लावावेत
आपल्याकडील शेअरमध्ये विविधता आणली, की जोखीम कशी कमी होत जाते ते आपण मागील लेखात पाहिले. पण ही विविधता म्हणजे केवळ निरनिराळ्या कंपन्यांचे वीस-पंचवीस प्रकारचे शेअर गोळा करणे नव्हे. या विविधतेतसुद्धा अनेक विविध प्रकारे विचार करता येतो.

40) तेजी-मंदीचा फेरा सर्वच शेअरना
विविध कंपन्यांचे शेअर घेतल्यामुळे आपल्या पोर्टफोलिओची जोखीम कमी होते हे खरे परंतु या जोखमीमध्येही दोन मुख्य प्रकार आहेत :